दि १७ जानेवारी २०२० धुळे — धुळे एज्युकेशन सोसायटीच्या मा ध पालेशा वाणिज्य महाविद्यालयात रेड रिबन क्लब तर्फे एड्स जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. रेड रिबन क्लबच्या विद्यार्थांनी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थांपर्यंत जागृती व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबविला. यात भिंतीला एक मोठा कापड लावण्यात आला. त्यावर कॕनव्हास पेंटींग प्रमाणे एड्स जनजागृतीपर संदेश लिहीण्यात आले. महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थांना संदेश लिहीण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा हेमंत जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम घेण्यात आला. एकूणच या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला. यातून सकारात्मक वातावरण तयार होण्यासाठी मदत झाली. यासाठी रेड रिबन क्लबच्या पदाधिका-यांनी जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडली. महाविद्यालयाचे प्राचार्य डाॕ पी पी छाजेड सर्व सहकारी प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
