पालेशा महाविद्यालयात राष्ट्रीय युवा दिन साजरा
धुळे-१३ जानेवारी २०२०
धुळे एज्युकेशन सोसायटीच्या मा ध पालेशा वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात आला. स्वामी विवेकानंद यांची व राजमाता जिजाऊ यांची जयंती असलेला हा दिवस. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॕ पी पी छाजेड, उपप्राचार्य प्रा विलास चव्हाण, रासेयो अधिकारी प्रा हेमंत जोशी व प्रा मिलिंद मून तसेच सर्व सहकारी प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठ्या संखेने उपस्थित होते. दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला. आजच्या युवा पिढी कडून ज्या विविध गोष्टी अपेक्षित आहेत त्या मांडण्यात आल्या. सर्व विद्यार्थांनी तसे आश्वासनही दिले. त्यानंतर सर्व विद्यार्थांनीही प्रतिमापूजन केले. या प्रसंगाचे औचित्य साधून गंथालयात महाविद्यालयाचे ग्रंथपाल डाॕ चंद्रशेखर वाणी व त्यांचे सहकारी श्री देशपांडे व श्री गुरव यांनी या थोर पुरुषांच्या ग्रंथांचे प्रदर्शही भरविले. त्याचाही विद्यार्थांनी मोठ्या संखेने लाभ घेतला.

पालेशा महाविद्यालयात राष्ट्रीय युवा दिन साजरा
Posted on by palesha
0